महाविकास आघाडीत मतभेदांचे पेटले वणवे; स्वतःचे राज्य सोडून ते विझवायला उद्या “बिहारी बंब” इकडे!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीत मतभेदांचे पेटले वणवे, पण स्वतःचे राज्य सोडून ते विझवायला उद्या बिहारी बंब इकडे!! अशी राजकीय अवस्था महाराष्ट्राची झाली आहे. महाराष्ट्रात एकीकडे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे वरिष्ठ नेते दररोज एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये करून महाविकास आघाडीत मतभेदाचे वणवे पेटवत चालले आहेत, तर दुसरीकडे उद्या बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची विरोधकांच्या राष्ट्रीय ऐक्यावर चर्चा करण्यासाठी मुंबईत येत आहेत. Nitish Kumar visiting Mumbai tomorrow for opposition unity, will meet Uddhav Thackeray and sharad Pawar

आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले की विरोधकांच्या राष्ट्रीय ऐक्य प्रयत्नांना अधिक जोर चढणार आहे. त्या दृष्टीनेच नितीश कुमार उद्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याच्या निमित्ताने मुंबईत येत आहेत. पण महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांमध्ये मतभेदांचे दरार वाढत चालली आहे. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत, उद्धव ठाकरे या सर्व नेत्यांनी एकमेकांविरोधात वक्तव्य केली आहेत.

त्याच वेळी महाविकास आघाडीचे जागावाटप ही सर्वांसाठीच गले की हड्डी बनली आहे. मुंबई महापालिका, लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या तिन्ही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे जागावाटप याची चर्चा देखील आघाडीचे नेते सुरू करू शकलेले नाहीत. त्या उलट आघाडीतले सर्वच प्रमुख नेते एकमेकांच्या उखाळ्या पाखळ्या काढण्यात मग्न आहेत.

महाविकास आघाडीतील उखाळ्या पाखाळ्यांची सुरुवात शरद पवारांच्या विस्तारित आत्मचरित्रातल्या काही टीका-टिपण्यांवरून झाली आहे. उद्धव ठाकरेंना त्यांनी “अकार्यक्षम मुख्यमंत्री” ठरवून टाकले, त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांबरोबरचे मतभेद ठळकपणे मराठी माध्यमांवर समोर येतील याची व्यवस्था ही शरद पवारांनीच करून ठेवली. अर्थातच त्यामुळे उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन्ही नेत्यांनी पवारांवर निशाणा साधून आपला कार्यभाग उरकून घेतला.

आघाडीत बेकी, राष्ट्रीय एकी

पवारांनी विस्तारित आत्मचरित्राच्या निमित्ताने महाविकास आघाडीत ठिणगी टाकून दिली. आता त्यांच्या अपेक्षेनुसार त्याचे वणवे भडकत चालले आहेत आणि तरी देखील पवार दुसरीकडे राष्ट्रीय ऐकण्यासाठी नितीश कुमार आणि बाकीच्या महाराष्ट्र बाहेरच्या नेत्यांची चर्चा करायला पुढे सरसावले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत बेकी आणि राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकी अशी अंतिमतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनुकूल ठरणारी कसरत शरद पवार करत आहेत.

Nitish Kumar visiting Mumbai tomorrow for opposition unity, will meet Uddhav Thackeray and sharad Pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात