‘सुअर तो झुंड में आते हे शेर तो अकेला आता है. माईंड इट ‘ अशा आशयाचे बॅनर्स सध्या रत्नागिरीत झळकले आहेत.Nitesh Rane is accused of a crime ” ; Shiv Sena MLA Vaibhav Naik slaps Nitesh Rane
विशेष प्रतिनिधी
कुडाळ : संताेष परब हल्ला प्रकरणानंतर आणि सिंधुदूर्ग जिल्हा बँकेवर भाजप म्हणजेच राणे गटाने सत्ता मिळवल्यानंतर आता कोकणात आता भाजपकडून पोस्टर वाॅर सुरु झाले आहे.जिल्हा बँकेच्या विजयानंतर रत्नागिरीत सध्या राणे कुटुंबाच्या समर्थनार्थ बॅनर बाजी पहायला मिळत आहे.
‘ सुअर तो झुंड में आते हे शेर तो अकेला आता है. माईंड इट’ अशा आशयाचे बॅनर्स सध्या रत्नागिरीत झळकले आहेत.दरम्यान या बॅनर्स वरून शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी घणाघात केला आहे.“भाजपाने ईश्वरचिठ्ठीवर निवडणूक जिंकली. दोन उमेदवार एक-एक मताने आले.
आम्ही त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खरंतर पोस्टरबाजी करु नये. नितेश राणे एका गुन्ह्यात आरोपी आहेत.त्यांनी पोलिसांना तपासात सहकार्य केलं पाहिजे. पोस्टरबाजी करु नये” असं शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App