अहमदनगरमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ

वृत्तसंस्था

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव महावितरणच्या वायरमनने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रदीप शांताराम कडाळे ( वय २५ , रा. कडाळेवस्ती , घारगाव, ता. संगमनेर ) असे या वायरमनचे नाव आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. MSEB employee commits suicide, Incident at Ahmednagar

कडाळे हे गुरुवारी ( ता.२३ ) नेहमीप्रमाणे घारगाव महावितरण येथे कार्यरत होते. अकलापुर रोड येथील एका कॉम्प्लेक्समध्ये ते राहण्यास होते. गुरुवारी रात्री कडाळे यांनी बेडरूमचा दरवाजा लावला. ते सकाळी दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या पत्नी पूजा यांनी कडाळे यांच्या मित्रांना फोनवरून कळविले. मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कडाळे यांच्या मित्रांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कडाळे यांनी लोखंडी हुकाला कापडी बेडशीट बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.



शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात कडाळे यांंचा मृतदेह पाठवला आहे. वायरमन कडाळे हे या ठिकाणी  पत्नीसोबत दोघेच राहत होते. कडाळे यांनी आत्महत्या का केली, याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही. गणेश विठ्ठल लेंडे (वय-२५, रा. खंदरमाळ) यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करीत आहेत.

MSEB employee commits suicide, Incident at Ahmednagar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात