नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपल्यात, तेच “सरकारी पाहुणे” बनणार!!; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल


प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील अल्पसंख्यांक कल्याणमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या घरी “सरकारी पाहुणे” येणार असल्याचे ट्विट केले होते. Kirit somaya take on nawab malik over wakf board land fraud in pune

या मुद्द्यावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांचा समाचार घेतला असून नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपल्या आहेत. त्यांना केंद्रीय तपास संस्था आपल्या घरी येण्याची खात्री आहे, म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत. पण असे हात-पाय मारून चौकशी आणि तपास थांबणार नाही, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी पुण्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या घोटाळ्यासंदर्भात माहिती दिली आहे.किरीट सोमय्या यांचे हे ट्विट असे :

नवाब मलिक सध्या बोलत आहेत की, “माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत” माझे नवाब मलिकांना एक सांगणे आहे, ” जर आपण घोटाळा केला असेल, पुणे वक्फ बोर्डाचा घोटाळा .. जमिन गोंधळात आपले नाव असेल…” “तर आपल्या घरी सरकारी पाहुणे नाही येणार… आपल्यालाच सरकारचे पाहुणे बनावे लागणार.

Kirit somaya take on nawab malik over wakf board land fraud in pune

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण