विशेष प्रतिनिधी
मुंबई : सहायक प्राध्यापक सहा ते सात वर्ष नोकरी कायम होण्याची वाट बघत आहेत. सेवा स्थायी व्हावी पगार वाढ मिळावी, सुट्टया मिळाव्या या सर्व मागण्या घेऊन आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातील 19 शासकीय वैद्यकीय कॉलेजसच्या अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे गेली पाच दिवस आंदोलन चालू आहे. या दरम्यान, सरकारकडून चर्चेसाठी बोलावणे आलेले नाही. Jhunka-bhakar movement of medical temporary assistant professors
आंदोलन एका टप्प्यावर येऊन थांबले आहे.शासकीय रुग्णालयांत ज्या पद्धतीने डॉक्टरांची आबाळ होतेय म्हणून प्रतिकात्मक झुणका भाकर आंदोलन ठरले होते. सर्व 19 मेडिकल कॉलेजच्या सहायक प्राध्यापकांनी झुणका-भाकर आंदोलनात सहभाग घेतला,
अशी माहिती डॉ सचिन मुलकुटकर (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना, जे जे मुंबई) यांनी सांगितली
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App