वृत्तसंस्था
उल्हासनगर : येथील एका शाळेने 16 शिक्षकांसह 2 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची घटना घडली आहे. In Ulhasnagar 16 Teacher’s job less, removed from work
सेवा सदन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इरा पूर्व प्राथमिक विद्यालय, इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे हे 16 शिक्षक, 2 शिक्षतेतर कर्मचारी आहेत. तब्बल 20 हून अधिक वर्ष त्यांनी शाळेत काम केले आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन लेक्चर, विद्यार्थ्यांचे रिझल्ट बनवले. मात्र, शाळा प्रशासनाने शिक्षकांची एक झूम मिटिंग घेऊन तासाभरात घरचा रस्ता दाखवल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली.
दरम्यान, वर्षभरापासून शाळेत नवीन प्रवेश होत नाही, विद्यार्थ्यांची फी येत नाही. त्यामुळे पगार देऊ शकत नसल्याने कारण शाळा प्रशासनाने दिले आहे.
शाळा प्रशासनाने त्यांची देयक दिली असली तरी भविष्यात उदरनिर्वाहाचा प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. शिक्षकांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळासह शिक्षण मंत्र्यांकडे न्यायासाठी साकडे घातले आहेत. दुसरीकडे शिक्षक परिषद या शिक्षकांच्या मदतीला धावून आली असून तिने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App