शिवसेनेविरुद्ध बंडखोर उमेदवार देऊन भाजपनं बेईमानी केली, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केलाय.‘If BJP had not been dishonest, Uddhav Saheb would not have been dishonest’; Gulabrao Patil’s beating
विशेष प्रतिनिधी
जळगाव : शिवसेना नेते आणि पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. जळगावमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत चार बंडखोर उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यावेळी मी स्वत: भाजपकडे तक्रार केली होती. शिवसेनेविरुद्ध बंडखोर उमेदवार देऊन भाजपनं बेईमानी केली, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केलाय.
इतकंच नाही तर त्यावेळी भाजपनं बेईमानी केली नसती तर ही वेळ आली नसती. पहिलं बेईमान कोण हे आधी भाजपनं तपासावं आणि मग बोलावं. पहिले ते बेईमान झाले नसते तर आज ते जसं म्हणत आहेत तसे उद्धव साहेब बेईमान झाले नसते, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी भाजपवर हल्ला चढवला.
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेकडे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते यांसारखे निष्ठावंत असताना त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही? असा सवाल केला होता. याला उत्तर देतांना गुलाबराव पाटील म्हणाले की, हा जर एकट्या शिवसेनेचा प्रश्न असता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. पण हा एकट्या शिवसेनेचा विषय नव्हता. सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App