एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास तो संपूर्ण वर्गच बंद ठेवणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे


लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्मने एक सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षनात 62 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला आहे.If a student is found positive, he will close the whole class – Health Minister Rajesh Tope


विशेष प्रतिनिधी

जालना : राज्यात दिवसेंदिवस कोरोना वाढतच चालला आहे.तसेच मागील काही दिवसांत राज्य सरकारने शाळा सुरू केल्या होत्या. परंतु विद्यार्थी कोरोनाबधित होऊ लागल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. दरम्यान लसीकरणाचा वेग वाढवून उद्यापासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरु होत आहेत.

दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये थोडे जरी कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवणार आहे.याबाबतच्या सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.



पुढे राजेश टोपे म्हणाले की, लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्मने एक सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षनात 62 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला आहे.त्यामुळे पालकांनी काळजी करण्याचे काहीही कारण नाही.

तसेच जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये, हा शाळा सुरू करण्याचा महत्वाचा हेतू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

If a student is found positive, he will close the whole class – Health Minister Rajesh Tope

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात