विशेष प्रतिनिधी
पुणे:शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या इतिहासामुळेच महाराष्ट्रात दंगली घडल्या असा आरोप संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी केला आहे. राज ठाकरेंनी वाटेल ते बोलून महाराष्ट्राला वेठीस धरु नये, तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्हाला जे तुमचे खरे इतिहास अभ्यासक, संशोधक वाटतात त्यांना, तुम्ही बोलवा.History written by Purandare caused riots, Sambhaji Brigade challenges Raj Thackeray for face to face discussion
आम्ही आमचे अभ्यासक आणि संशोधक बोलवून एक चर्चा सत्र घडवू, असे आव्हानही आखरे यांनी दिले आहे.राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना आखरे म्हणाले ते प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत. मात्र, संभाजी ब्रिगेड ही वैचारिक वारसदार आहे.
राज ठाकरे ज्या लोकांचा इतिहास वाचताय त्यांच्या लिखानामुळेच महाराष्ट्रात दंगली घडल्या आहेत. तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्हाला जे तुमचे खरे इतिहास अभ्यासक, संशोधक वाटतात त्यांना तुम्ही बोलवा आम्ही आमचे अभ्यासक आणि संशोधक बोलवून एक चर्चा सत्र घडवू. आम्ही निश्चित सांगू शकतो की तुम्हाला सत्य इतिहासाचं दर्शन घडवू शकतो.
तुम्हाला जे संदर्भ हवे आहेत ते सत्य आणि ऐतिहासिक संदर्भ देऊन आम्ही इतिहास मांडू. तुम्ही हिंमत दाखवा आणि चर्चासत्र बोलवा. वायफळ चर्चा आणि उगाच जिभेला आलं असं बोलून उगाच महाराष्ट्राला वेठीस धरु नका. महाराष्ट्र पुरोगामी असून महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा आहे. तिचं जतन करण्याचं काम आजपर्यंत आम्ही केलं आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App