तुकाराम सुपेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ ; सापडली ‘ इतक्या ‘ लाखांची रोकड

आतापर्यंत तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त केलेली रोकड आणि सोन्याचे दागिने एकूण 3 कोटी 90 लाख इतके आहे.Further escalation of Tukaram Supe’s difficulties; Found ‘so many’ lakhs of cash


विशेष प्रतिनिधी

पुणे : टीईटी परिक्षेत पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. टीईटी गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुपे व सावरीकर यांच्यासह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशातच आता याप्रकरणी तुकाराम सुपेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.



तुकाराम सुपेंकडून आज आणखी 33 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.याआधी म्हणजे ज्यावेळी सुपे यांना अटक करण्यात आली त्यावेळी पेपरफुटीप्रकरणात पुणे पोलिसांना तुकाराम सुपेच्या घरात 2 कोटी रुपये आणि मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याची माहिती समोर आली होती.

आतापर्यंत तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त केलेली रोकड आणि सोन्याचे दागिने एकूण 3 कोटी 90 लाख इतके आहे. तुकाराम सुपेंवर कारवाई करण्यात आल्यावर तपासात त्यांनी लपवलेले सगळे पैसे हळूहळू समोर येत आहे.दरम्यान, हे पैसे त्याच्या वेगवेगळ्या नातेवाईकांच्या घरी दडवून ठेवले होते.त्यामुळे आता सुपेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे.

Further escalation of Tukaram Supe’s difficulties; Found ‘so many’ lakhs of cash

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात