आटपाडीत ख्रिस्ती धर्मांतर करणाऱ्या डॉ. संजय गेळेला अटक; पत्नी अश्विनी गेळे फरार

प्रतिनिधी

मुंबई : आटपाडीत असाध्य आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे करत असल्याचा दावा करत त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न डॉ. संजय गेळे करत होता. त्याला विरोधात जोरदार विरोध झाला. धर्मांतर प्रकरणी डॉ. गेळे याला पोलिसांनी अटक केली. Dr. who converted to Christianity in Atpadi. Sanjay Gele arrested; Wife Ashwini Gele absconding

सापळा रचून केली अटक 

आटपाडी येथील वरद हॉस्पिटलमध्ये संजय गेळे आणि त्यांची पत्नी अश्विनी हे दोघे अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरवर असणाऱ्या महिलेच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करून तंत्र – मंत्र म्हणत त्यांना बरे करत असल्याचा दावा केला. अशा प्रकारे समाजात त्यांनी अंधश्रद्धा पसरवली, तसेच यामाध्यमातून ख्रिस्ती धर्मांतर घडवण्याचा प्रयत्न केला.


ईशान्य भारतात ख्रिश्चन धर्मांतरासाठी Amazon चा पैसा; ऑर्गनायझर मासिकातून आरोप


या प्रकरणी संपतराव नामदेव धनवडे यांनी डॉ. गेळे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. याविरोधात आटपाडीत हिंदुत्ववादी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यामुळे पोलिसांवर दबाव आला. आटपाडीचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे आणि प्रमोद रोडे, शंकर पाटील यांनी बुधवारी, 28 डिसेंबर रोजी रात्री सापळा रचून संजय गेळेला अटक केली. मात्र, अश्विनी फरार आहे. तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे.

Dr. who converted to Christianity in Atpadi. Sanjay Gele arrested; Wife Ashwini Gele absconding

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात