माझी धर्मगुरूंना प्रार्थना राहील की आवाहन करताना आपण कुणालाही प्रक्षुब्ध करणारं किंवा रोष वाढवणारं वक्तव्य करू नये. तुमचे जे हक्क आहेत ते आहेतच. पण विनाकारण या गोष्टीचं भांडवल करू नये, असे आवाहन गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.Don’t make provocative or outrageous statements, Home Minister Dilip Walse Patil’s appeal
विशेष प्रतिनिधी
पुणे – माझी धर्मगुरूंना प्रार्थना राहील की आवाहन करताना आपण कुणालाही प्रक्षुब्ध करणारं किंवा रोष वाढवणारं वक्तव्य करू नये. तुमचे जे हक्क आहेत ते आहेतच. पण विनाकारण या गोष्टीचं भांडवल करू नये, असे आवाहन गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
कर्नाटक राज्यात उडुपीमध्ये एका महाविद्यालयाने हिजाब घातलेल्या मुस्लीम मुलींना प्रवेश नाकारल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले असून राजकीय पक्षांनी देखील यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.
https://youtu.be/CSph74KByrE
हिजाब प्रकरणावरून आंदोलन होण्याची परिस्थिती पाहाता दिलीप वळसे पाटील म्हणाले परराज्यातल्या एखाद्या मुद्द्यावर आपल्या राज्यातली शांतता बिघडवू नका. जातीजातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये आपण अनावश्यक संघर्ष करायला लागलो, तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे हे आंदोलन शक्यतो करू नये. माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावे.
गृहमंत्री म्हणाले, “जे मी सामान्य नागरिकांना सांगितलं तेच राजकीय पक्षांनाही सांगतो आहे. त्यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून अस्वस्थता निर्माण करू नये आणि पोलीस विभागाचं काम वाढवू नये.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App