• Download App
    सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवईंच्या कन्येचा हुंड्यासाठी छळ, नागपुरात पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल । Daughter of Supreme Court Justice Bhushan Gavai filed a case of dowry harassment against 5 including husband in Nagpur

    सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवईंच्या कन्येचा हुंड्यासाठी छळ, नागपुरात पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    dowry harassment :  सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची मुलगी करिश्मा गवई हिने नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला आहे. करिश्मा गवई या न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या कन्या आहेत. Daughter of Supreme Court Justice Bhushan Gavai filed a case of dowry harassment against 5 including husband in Nagpur


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची मुलगी करिश्मा गवई हिने नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला आहे. करिश्मा गवई या न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या कन्या आहेत.

    करिश्मा यांचे काही दिवसांपूर्वी 8 वर्षे लहान तरुणाशी लग्न झाले होते. आता करिश्मा यांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. करिश्मा यांचे सासरे पुरुषोत्तम दरोकर, ललिता दाोकर, मामा संजय टोंगसे, पती पलाश दरोकर आणि प्रशांत टोंगसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल असून पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना अटक केली आहे, तर 2 जण फरार आहेत.

    प्रकरणाचे गांभीर्य पाहता नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी करिश्मा यांच्या तक्रारीनंतर भादंवि कलम 498 ए, 323, 294, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यासह पोलिसांनी या आरोपींविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल केला आहे. पोलिसांकडून पती पलाशसह प्रशांतचा शोध घेण्यात येत आहे.

    Daughter of Supreme Court Justice Bhushan Gavai filed a case of dowry harassment against 5 including husband in Nagpur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhagan Bhujbal : राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी

    Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचे 5 दिवसांत 60 लाख फॉलोअर्स; जाहीरनामा प्रसिद्ध- महिलांना 50% आरक्षण, CJI ना राज्यसभेवर पाठवणार नाही

    NEET Re-Exam : नीट फेर-परीक्षेपूर्वी बनावट टेलिग्राम चॅनेलवर कारवाई; शिक्षणमंत्री म्हणाले- त्वरित ब्लॉक करा; पेपरफुटी प्रकरणात 5 आरोपींना तुरुंगात पाठवले