ऐक्याची अनुभूती कार्यकर्ता विकास वर्गातून मिळते; नागपूरात द्वितीय शिक्षा वर्गाला प्रारंभ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’ आज रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सुरू झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’ आज रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सुरू झाला.
राजधानी एक्सप्रेसमधून चाललेल्या एका मोठ्या ड्रग्ज तस्करीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) पर्दाफाश केला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर केलेल्या या कारवाईत एका महिला प्रवाशाकडून तब्बल ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत सुमारे ४.२६ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले.
नागपूरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (SDAL) च्या प्लांटमधून ‘गाईडेड पिनाका’ रॉकेट प्रणालीला हिरवा झेंडा दाखवला. याच प्लांटमधून आता गाईडेड पिनाकाची निर्यात आर्मेनियाला केली जाईल. याप्रसंगी त्यांनी SDAL च्या मीडियम कॅलिबर दारुगोळा सुविधेचे (एम्युनिशन फॅसिलिटी) देखील उद्घाटन केले
महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नागपुरात महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडले आहे. जागावाटपाच्या अनेक फेऱ्यांनंतर अखेरच्या क्षणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यातील युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी काँग्रेसवर जाणीवपूर्वक दगाबाजी केल्याचा गंभीर आरोप करत, आता आमचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
सरकारी नोकरीत असूनही ९५२६ महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेत नाव नोंदणी केली आणि वर्षभरात सुमारे १४ कोटी ५० लाख रुपये लाटले, अशी माहिती हिवाळी अधिवेशनात समोर आली. महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत उपस्थित तारांकित प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे की, १४,२९८ पुरुषांनीही बनावट कागदपत्रे सादर करून २१ कोटी ४४ लाख रुपये गिळंकृत केले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अर्ध्याहून अधिक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. हे आमदार ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येण्याचा मानस व्यक्त केला आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी आपल्याकडे या आमदारांची नावे असल्याचाही व प्रसंगी ते जाहीर करण्याचाही इ्शारा दिला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, वेगळ्या विदर्भावर आम्ही काम करत असून आमची त्याबाबतची भूमिका कायम आहे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
काँग्रेसमध्ये कुणीही- कुणाला सहन करायला तयार नाही.त्यामुळे काँग्रेस पक्ष रोज कमजोर होत आहे, त्यांचे कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नेत्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. असमन्वय असल्याने नेत्यांना कार्यकर्त्यांना सांभाळायला कुणी तयार नाही. त्यामुळे अस्वस्थ कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर या यातूनच अस्वस्थ होत बोलल्या असतील असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी एका अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली. या अधिवेशनात राज्यातील कळीचे कायदे, जनहिताचे प्रश्न व विभागीय विकास आदी मुद्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात झालेल्या दिरंगाईवरही या अधिवेशनात गरमागरम चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेड कंपनीला संरक्षण आणि एअरोस्पेस उपकरणांच्या निर्मितीसाठी मिहान एसईझेड, नागपूर येथील सुमारे 223 एकर भूखंडाचे वाटपपत्र अटींच्या अधीन राहून प्रदान केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ओबीसी समाजासाठी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजात असलेली अस्वस्थता लक्षात घेऊन त्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण विधान केले. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांची केवळ घोषणा झाली होती, मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर 60 नवीन ओबीसी वसतिगृहे सुरू केली. तसेच, 10 लाख ओबीसींना हक्काची घरे दिली आणि समाजासाठी असलेली आर्थिक महामंडळेही मजबूत केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचचालक मोहन भागवत म्हणाले की, “देशातील अनेक लोकांना हिंदुत्वाचा अभिमान होता आणि त्यांनी हिंदू एकतेबद्दल बोलले, परंतु आरएसएससारखी संघटना फक्त नागपुरातच निर्माण होऊ शकली. त्याग आणि समाजसेवेची भावना येथे आधीच अस्तित्वात होती.”
नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेल्या भव्य महामोर्चातून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भातील 2 सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली. हा मोर्चा यशवंत स्टेडियमपासून सुरू होऊन संविधान चौकात सभेत रूपांतरित झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) गुरुवारी विजयादशमीला संघटनेची शताब्दी साजरी करत आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सर्वप्रथम आरएसएस संस्थापक डॉ. हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहिली. प्रमुख पाहुणे माजी राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनीही श्रद्धांजली वाहिली.
गत पन्नास वर्षात शेतकऱ्यांचे पावसामुळे जेवढे नुकसान झाले नसेल तेवढे नुकसान राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या पावसाने झाले आहे. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भाग उध्वस्त झाले आहेत. राज्याच्या प्रत्येक भागात शासन शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळप्रसंगी ड्रोनच्या सहाय्याने व याचबरोबर प्रत्यक्ष पंचनाम्याच्या माध्यमातून अधिकाधिक मदत केली जाईल, असे सांगितले आहे. आम्ही वेळप्रसंगी निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करू, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री तथा माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई यांच्या पत्नी कमलताई गवई ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला हजेरी लावणार असल्याची माहिती त्याचे सुपुत्र डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिली आहे. कमलताई गवई यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले आहे. संघाशी वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणे हे विचारांचा स्वीकार करणे नसते, असे राजेंद्र गवई यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देत उपसा जलसिंचन योजनांसाठी वीजदर सवलतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही सवलत मार्च 2027 पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता राज्यात ओबीसी समाजाचे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे आहेत. सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला असून, या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. नागपूरमध्ये झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत महामोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीला विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमधील ओबीसी नेते उपस्थित होते.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी नागपूरच्या संविधान चौकात पाच दिवसांपासून सुरु असलेले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. ओबीसींच्या 14 मागण्यांपैकी 12 मागण्या सरकारने मान्य केल्या असून, या मागण्यांसंदर्भातील शासन आदेश एका महिन्यात काढला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी उपोषण थांबवण्याची घोषणा केली.
मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबावर आरोप करत त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. तसेच आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे.
आमचा सुप्रिया सुळे यांना सवाल आहे त्या जरांगेंच्या स्टेजवर गेल्याच कशाला? त्यांच्या वडिलांनी देशात पहिल्यांदा ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू करून आरक्षण दिले आणि त्याच आज जरांगेना पाठिंबा द्यायला स्टेजवर जातात? याला शरद पवारांचा पाठिंबा आहे का? असा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज मनोज जरांगे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली, यावरून शेंडगे यांनी टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. नोंदी मिळालेल्या ५४ लाख मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे. ते पाहता सरकार दबावात निर्णय घेण्याची भीती ओबीसी समाजात आहे. मात्र दबावात येऊन निर्णय घेतल्यास वा तसे दिसल्यास आम्हीही आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा रोखठोक इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. सरकारने कुणबी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्हीही मुंबईत धडकू, असा सज्जड इशाराही तायवाडे यांनी यावेळी दिला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी सांगितले की, संस्कृत ही भारतातील सर्व भाषांची जननी आहे. आता ती बोलली जाणारी भाषा बनवण्याची वेळ आली आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात ते म्हणाले की, संस्कृत केवळ समजली पाहिजे असे नाही तर ती कशी बोलायची हे देखील माहित असले पाहिजे.
नागपूरमधील एका बारमध्ये बसून सरकारी फायलींवर सह्या करताना आढळलेल्या अधिकाऱ्याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के याच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.