नाशिक – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून “राजकीय हिरोगिरी” करणाऱ्या शिवसेनेमागे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची राजकीय नेत्यांची फरफट चालली असल्याचे स्पष्ट होत आहे. नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसेना – भाजपचा संघर्ष राज्यभर तीव्र होणार. दोन्ही पक्षांचे नेते आक्रमकपणे एकमेकांवर तुटून पडणार त्यातून निर्माण होणाऱ्या झंझावातात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना काही स्थानच उरणार नाही याची भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटायला लागली आहे.Chief Minister Uddhav Thackeray is the identity of Maharashtra, then who is Sharad Pawar ??; NCP’s political ploy behind Shiv Sena’s arrest of Narayan Rane
यातून राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रतिक्रिया व्यक्त कराव्या लागत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा अपमान हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, असे म्हणावे लागत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोनच ओळीची प्रतिक्रिया व्यक्त करून हा विषय संपविण्याचा प्रयत्न त्यासाठीच केला आहे.
मला काही बोलायचे नाही. नारायण राणे हे त्यांच्या संस्कृतीनुसार बोलले एवढेच ते म्हणाले. या विधानातून त्यांनी नारायण राणे यांच्या मूळ संस्कृतीला म्हणजे शिवसेनेच्या राजकीय संस्कृतीला नावे ठेवून घेतली. हा विषय अधिक वाढला तर याचा फायदा शिवसेनेला अधिक मिळेल, हे पवारांसारख्या नेत्यांना समजते. शिवसैनिकांना चार्ज्ड व्हायला वेळ लागत नाही.
संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटल्याने शिवसेना आणि भाजप यांच्यातील घमासान लढाईत आपले कार्यकर्ते खिसगणतीतही उरणार नाहीत, याची शरद पवारांना जाणीव आहे. त्यामुळेच त्यांनी थोडक्यात प्रतिक्रिया आटोपून दिली.
पण राष्ट्रवादीच्या बाकीच्या नेत्यांना पवारांचा ही चाणाक्ष चाल समजली नाही. जयंत पाटील आणि नबाब मलिक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अपमानाचा मुद्दा महाराष्ट्राशी जोडून टाकला. त्यामुळे शिवसेनेला आणखीनच बळ मिळाले.
पण महाराष्ट्राची अस्मिता स्वतःलाच म्हणवून घेणारे नेते आपल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, हे जयंत पाटील आणि नबाब मलिक हे दोन्ही नेते विसरले आणि त्यांनी नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून स्वतःहून शिवसेनेला पुढची राजकीय चाल देऊन टाकली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App