भाजपने या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठ्या नेत्यांना मैदानात उतरवल आहे. आतापर्यंत रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, भागवत कराड आणि आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते प्रचारासाठी येत आहेत.Chandrakant Patil’s abandonment offer! He said, “I will provide village meals to the villages leading the BJP.”
विशेष प्रतिनिधी
नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. पोटनिवडणूक निमित्त काल कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती.या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना एक भन्नाट ऑफर दिली आहे. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असून स्वतः चंद्रकांत पाटील या गवजेवणात सहभागी होणार आहेत. कार्यकर्त्यांना दिलेल्या ऑफरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
भाजपने या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठ्या नेत्यांना मैदानात उतरवल आहे. आतापर्यंत रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, भागवत कराड आणि आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते प्रचारासाठी येत आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी देगलूर पोट निवडणुकीसाठी गावोगावी प्रचार सभा घेतल्या आहेत .तसेच नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हेदेखील जोरदार प्रचार करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App