BJPs Chandrakant Patil says We Will March on Streetwith Raj Thackeray and Prakash Ambedkar against injustice

चंद्रकांत पाटलांचा घणाघात, सत्य बाहेर येणारच, अन्यायाविरुद्ध राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांसह रस्त्यावर उतरू!

Chandrakant Patil Interview : परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकारणात निर्माण झज्ञलेल्या भूकंपाचे धक्के अजूनही बसत आहेत. गल्ली ते दिल्ली याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. राज्यातील सर्वच विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या आणि त्यांच्या सखोल उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याविषयावर राज्य सरकारला घेरून टीकेचा भडिमार केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकारणात निर्माण झज्ञलेल्या भूकंपाचे धक्के अजूनही बसत आहेत. गल्ली ते दिल्ली याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. राज्यातील सर्वच विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या आणि त्यांच्या सखोल उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil Interview) यांनीही याविषयावर राज्य सरकारला घेरून टीकेचा भडिमार केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वसुली करण्यासाठी वाझेंना पोलिस सेवेत पुन्हा रुजू केले होते. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शरद पवार यांनासुद्धा दिली होती, त्यासंदर्भात त्यांनी काय केले?

पाटील पुढे म्हणाले की, आम्ही संघर्ष करू… रस्त्यावर उतरू… आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊ! या सरकारचा राज्यात जो काही सावळा गोंधळ सुरू आहे त्याबाबत आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राष्ट्रपतींना अहवाल पाठविण्याची विनंती आम्ही राज्यपालांना करू!

सरकारचा रिमोट कंट्रोल पवारांच्या हाती

गृहमंत्र्यांच्या भवितव्यावरील निर्णयाचा चेंडू पवारांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे टोलावला होता. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठीत एक म्हण आहे की, ‘नेत्याची इच्छा ही तर आज्ञा!’ मग मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी भाषा शरद पवार यांची कधीपासून झाली? या संपूर्ण सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवारांच्या हाती आहे! या सरकारमध्ये शरद पवार म्हणतील तेच होईल मग हे सर्व नाटक कशाला?

अन्यायाविरुद्ध राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांसह रस्त्यावर उतरू…

चंद्रकांत पाटील म्हणाले की, या सर्व प्रकरणात जेव्हा सत्य बाहेर येईल त्यावेळेस राज ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे या सरकारमध्ये फटाके लागतील. जरी राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची आणि आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी असली तरी अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी आम्ही एकत्र रस्त्यावर उतरू.

पवार एकटे पडले, पक्षावर वचक राहिला नाही

धनंजय मुंडे प्रकरणाचे उदाहरण देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार हे जरी आमचे राजकीय विरोधक असले तरी त्यांचा राजकीय इतिहास पाहता ते नेहमीच अन्यायाविरुद्ध शासन झालं पाहिजे अशी भूमिका घेतात. परंतु आता शरद पवारांचा त्यांच्या पक्षावरचा वचक कमी झाला आहे. त्यामुळेच धनंजय मुंडेच्या वेळेसही पवार एकटे पडले आणि मुंडेंवर कारवाई करू शकले नाही.

सरकार चालवताना चुका झाल्या तर मग तुम्हाला राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात हे असंच आजपर्यंत घडलं आहे. याआधीही लहानशा चुकांसाठी अनेक मुख्यमंत्र्यांना घरी जावे लागले. मग या सरकारची एवढी मोगलाई का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*