वृत्तसंस्था
पुणे : दक्षिण कोकणात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. Chance of rain with thunderstorm in Konkan; In the rest of the state, the heat wave continues
उत्तर भारतातील राजस्थान, गुजरातचा कच्छ या भागात तापमानाचा पारा ४५ अंशांच्या आसपास आहे. तेथून राज्याकडे उष्ण वारे वाहत आहेत, तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो अंदमान बेटाकडे सरकला आहे. राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमानाचा पारा वाढला आहे. तसेच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. ही स्थिती चार ते पाच दिवस राहणारआहे.
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच मराठवाड्यात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App