कोणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही, खडसेंवर निशाणा साधताना चंद्रकांत बावनकुळे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा?


विशेष प्रतिनिधी

जळगाव : मी असो अथवा एकनाथ खडसे असो, सर्वांना पक्षाने खूप काही दिले. पंकजा मुंडे यांनाही पक्षाने भरपूर संधी दिली. त्यामुळे पक्षाने अन्याय केला, हे खडसेंचे म्हणणे चुकीचे आहे.BJP doesn’t care if anyone leaves, Chandrakant Bavankule’s warning to Pankaja Munde while targeting Khadse?

कोणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही, असा शब्दांत एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधताना माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांनाच इशारा दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



बावकुळे म्हणाले, विरोधी पक्षांनी खडसे यांच्यासह पंकजा मुंडे यांच्या मनात संभ्रम निर्माण केला. पंकजा मुंडे यांच्याबाबतही झारीतील शुक्राचार्य वेगळेच आहेत. इतके दिवस झाले तरी राष्ट्रवादीने खडसे यांना मंत्रिपद दिले नाही, अजूनही त्यांना लटकवून ठेवले आहे.

खडसेच काय तर कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडणार नाही. भाजप हा कार्यकर्त्यांवर चालणारा पक्ष आहे, नेत्यांवर नाही.महाविकास आघाडी सरकार हे केवळ मुंबईपर्यंतच मर्यादित असल्याची टीका करताना बावनकुळ म्हणाले,

मुख्यमंत्री मुंबईपुरता, उपमुख्यमंत्री पुण्यापुरता तर सरकारमधील पालकमंत्री आपापल्या मतदारसंघापुरते काम करत आहेत. या सरकारचा प्रचंड अनागोंदी कारभार सुरू आहे.

राज्य सरकारच्या नाकर्त्या भूमिकेमुळे ओबीसी आणि मराठा आरक्षण रद्द झाल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे. राज्य सरकारने ३० डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर मंत्र्यांच्या गाड्यांना गावात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

BJP doesn’t care if anyone leaves, Chandrakant Bavankule’s warning to Pankaja Munde while targeting Khadse?

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात