BIG BREAKING: CBSE board 12th exam will not be canceled; exam date will be announced on June 1!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संकटात सर्वाधिक नुकसान विद्यार्थ्यांचं होत आहे. अशावेळी १०वी, १२वी बोर्डाच्या परीक्षा ( 12th Board Exam 2021) घेतल्या जाव्यात की नाही यासाठी आज केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. ज्यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्र्यांसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिव सहभागी झाले होते.या बैठकीला महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या महाराष्ट्र सरकारच्या वतीने हजर होत्या. या बैठकीनंतर अशी माहिती मिळाली आहे की, सरकारने परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे.BIG BREAKING: CBSE board 12th exam will not be canceled; exam date will be announced on June 1!
ही बैठक CBSE तर्फे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी याबाबत होती. सीबीएसई बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा या जुलै महिन्यात आयोजित केल्या जाऊ शकतात. ज्याची अधिकृत घोषणा ही केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे १ जून रोजी करु शकतात.
या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊनच या संदर्भातील निर्णय व्हावा असं मत मांडलं.
दहावीची परीक्षा रद्दच:
राज्य सरकारतर्फे रद्द करण्यात आलेली दहावीची परीक्षा ( 10th Board Exam 2021) न घेण्याच्या निर्णयावर सरकार ठाम आहे. उच्च न्यायालयासमोर सरकार याबाबतची भूमिका मांडणार आहे. सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती असाधारण आहे. इंटरनेट आणि इतर समस्यांमुळे ऑनलाईन परीक्षेचा विचार करता येत नाही. असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षा न घेण्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.
महाराष्ट्रात १४ लाख विद्यार्थी
कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबद्दल आपल्याला माहिती आहे की, जसं सांगितलं जातेय की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जादा धोका असल्याचं वर्तवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख आहे.तर, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या २५ हजार आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट क करताना सुरुक्षित वातावरणात केली पाहिजे. बारावीची परीक्षा महिनाभरानंतर राज्यातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, अशी विनंती केल्यांचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App