बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेनेचे नेते सुधीर जोशी यांचे निधन!!


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर मागील महिनाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेत कार्यरत होते. शिवसेनेतील एक उच्च शिक्षीत आणि सोज्वळ चेहरा होता. वयाच्या 81 व्या वर्षी राहत्या घरी त्यांचे निधन झाले.Balasaheb’s loyal Shiv Sainik, Shiv Sena leader Sudhir Joshi passed away !!

– बाळासाहेब ठाकरेंच्या अत्यंत जवळचे

सुधीर जोशी यांना जानेवारीमध्येच कोरोनाची बाधा झाल्यामुळे मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. त्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत त्यांची महत्वाची भूमिका राहिली. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर माधव देशपांडे, शाम देशमुख, बळवंत मंत्री हे प्रमुख नेते बाळासाहेबांशी जोडले गेले. पुढे मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या दोघांनी शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेबांसोबत मोठे काम केले. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत शिवसेना नेते म्हणून त्यांनी काम केले.

1972 मध्ये ते मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि युतीच्या काळात सुरूवातीला महसूल मंत्री आणि नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

Balasaheb’s loyal Shiv Sainik, Shiv Sena leader Sudhir Joshi passed away !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात