WATCH : बीडमध्ये अधिकार्‍यांनी धरला डीजेवर ठेका कोरोनाचे नियम पायदळी तुडवले

विशेष प्रतिनिधी

बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. या परिस्थितीत देखील नगरसेवक फारुख पटेल यांच्या नातेवाईकांचा शाही विवाह सोहळा पार पडला आहे. दरम्यान याची माहिती मिळताच नगरपालिकेसह पोलिस प्रशासनाने या ठिकाणी धाव घेऊन पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.Authorities in Beed trample corona rules; dance on DJs, The royal wedding ceremony of the relatives of the corporator

दुसरीकडे बीडमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनीच चक्क डीजेच्या तालावर ठेका धरला आहे. यावेळी बेभान होऊन कोरोनाचे नियम पायदळी तुडवत डीजेच्या तालावर धांगडधिंगा सुरू होता. तर एकाच्याही तोंडाला मास्क देखील नव्हते,



https://youtu.be/d6-2v6bucRs

कपिलधार परिसरात ट्रेकिंगच्या नावाखाली शासकीय अधिकार्‍यांकडून ही हुल्लडबाजी केली जात होती. त्यामुळे प्रशासनाचे नियम केवळ सर्वसामान्यच आहे का? असा प्रश्न देखील आता उपस्थित होऊ लागला आहे.

  • बीडमध्ये अधिकार्‍यांनी धरला डीजेवर ठेका
  • डीजेच्या तालावर धांगडधिंगा
  • एकाच्याही तोंडाला मास्क देखील नव्हता
  • कपिलधार परिसरात डिजेवर नाच
  • कोरोनाचे नियम पायदळी तुडवले
  • नगरसेवकाच्या नातेवाईकांचा शाही विवाह
  •  पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला

Authorities in Beed trample corona rules; dance on DJs, The royal wedding ceremony of the relatives of the corporator

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात