नगरच्या फकीरवाड्यात औरंगजेब नाचविला; एमआयएमच्या चौघांविरुद्ध गुन्हा, गुन्हेगार फरार; पोलीस शोधात!!


प्रतिनिधी

नगर : अहमदनगरच्या फकीरवाड्यात औरंगजेब नाचविला. त्यामुळे एमआयएमच्या चार कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून औरंगजेब नाचविणारे हे कार्यकर्ते फरार झाले आहेत.Aurangzeb danced in the town’s Fakirwada; Crime against four of MIM, criminals absconding; Police in search!!

नगर मधील फकीरवाड्यात दमबाडा हजारी दर्ग्याच्या संदर्भात उरूसादरम्यान एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचविला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे नगरच नव्हे, तर महाराष्ट्रातले हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतापले. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या घटनेची दखल उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन पोलिसांना ताबडतोब कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.



त्यानंतर नगरच्या भिंगार पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन एमआयएम पक्षाच्या चार कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मोहम्मद सरफराज सय्यद जहागीरदार, अफनान आदिल शेख उर्फ खडा, शेख सरवर आणि जावेद शेख उर्फ गब्बर अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघा कार्यकर्त्यांची नावे आहेत. औरंगजेबाचा फोटो नाचवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध भिंगार पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनीच गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्याची बातमी येताच हे चौघे फरार झाल्याचीही बातमी आली आहे. पोलिसांची टीम त्यांच्या शोधासाठी लगेच रवाना झाली आहे.

याआधी त्र्यंबकेश्वर मधील संदलच्या निमित्तानेच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाज्यातून आत जाऊन धूप दाखविण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे देखील त्र्यंबकेश्वर मध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. असाच तणाव नगरमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पण पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून फरारी आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची टीम प्रत्यक्ष कामालाही लागली आहे.

Aurangzeb danced in the town’s Fakirwada; Crime against four of MIM, criminals absconding; Police in search!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात