विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य मागासवर्ग ४५० कोटींची घोषणाआयोगासाठी विजय वडेट्टीवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ वाहवा मिळवण्यासाठी केली. वडेट्टीवारांनी आयोगाची अवस्था फुकटचं घावलं, सार गाव धावलंसारखी केल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.Announcing Rs 450 crore for Backward Classes Commission is in the air.
गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे की, ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवत मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली. वास्तविक फक्त साडेचार कोटी दिले. पण ते खर्च करण्याचे आदेशही आयोगाला मिळाले नाहीत.
ना ऑफिस ना पुर्णवेळ सचिव, आयोगाचे संशोधक सोलापूरात तर आयोग पुण्यात वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली, अशी टीका भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
ओबीसींच्या नावावर मंत्रीपद भूषवतात आणि प्रस्थापितांसाठी पोपटपंछी करतात. १७ जानेवारीला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी आहे आणि त्या करिता ठाकरे सरकारने आयोगाला अंतिरम अहवाल मागितला होता. पण आयोगाचे कामच सुरू नाही झाले तर अहवाल कसा देणार? आणि म्हणूनच दिशाभूल करण्यासाठी लगबगीने वडेट्टीवारांनी तीन महिन्याची मुदत न्यायालयाला मागणार,
असे जाहीर केले, असा आरोप करून पडळकर म्हणाले, याचा अर्थ महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण राहणार नाही आणि प्रस्थापित ओबीसींच्या राजकीय हक्कावरती डल्ला मारणार. म्हणून समस्त ओबीसी बांधवांना आवाहनही करतो की तुमच्या जीवावरती लाल दिवा मिळवणारे आणि आपल्यालाच फसवणाºयाओबीसी मंत्र्यांना जिथे भेटेल तिथे गाठा आणि जाब विचारा.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App