विशेष प्रतिनिधी
सातारा : ऑलवेज देअर फॉर यू. मनापासून, खरोखर… काय बोलायचं.. तुम्हाला बघितल्यानंतर पारणं फिटतं ना, तसं झालं. शप्पथ सांगतो, मनापासून एवढा जीव लावला ना तुम्ही त्याची कशी परतफेड करु मला माहिती नाही ,असे म्हणत खासदार उदयराजे भोसले यांना व्यासपीठावरच रडू कोसळले.Always there for you, Udayan Raje Bhosale started crying on stage
सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भावूक झाले. सातरकर आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत असताना उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी त्यांनी सातारकरांना ‘ऑलवेज देअर फॉर यू’ म्हणत माझ्यावर जीव लावणाऱ्यांची मी कशी परतफेड करु? असं म्हणत भर मंचावर त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. ते म्हणाले,
ऑलवेज देअर फॉर यू. मनापासून, खरोखर… काय बोलायचं.. तुम्हाला बघितल्यानंतर पारणं फिटतं ना, तसं झालं. शप्पथ सांगतो, मनापासून एवढा जीव लावला ना तुम्ही त्याची कशी परतफेड करु मला माहिती नाही. मी कामाच्या स्वरुपाने ते करतो. मनापासून आय लव्ह यू टू मच.. इन्फिनिटिव्ह.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App