केंद्र सरकारच्या रडारवर आदित्य ठाकरे; 2.5 वर्षांतल्या कामकाजाचे होणार ऑडिट!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : 1032 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीचे समन्स आले. येत्या दोन दिवसांत त्यांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या रडावरवर युवासेनाप्रमुख आमि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले आहेत. मोदी सरकारने आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री म्हणून गेल्या 2.5 वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयांचे आणि कामकाजाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. Aditya Thackeray on central government’s radar

पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्या कामकाजाचे ब-याचदा कौतुक झाले होते. परंतु, आता केंद्र सरकारने या सगळ्याची समीक्षा केल्यास त्यामधून काय निष्पन्न होणार, ते पाहावे लागेल. केंद्र सरकारकडून विशेषत: महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या कारभाराचे ऑडिट केले जाणार आहे.

महाराष्ट्र प्रदूषण मंडळ कारभाराचे ऑडीट सुरू

केंद्र सरकराने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील कारभाराचे ऑडीट सुरूही केले आहे. मुंबई, पुणे,कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचेही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Aditya Thackeray on central government’s radar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात