जोपर्यंत आर्यनला जामीन मिळणार नाही तोपर्यंत घरात खीर बनवणार नसल्याची मन्नत गौरी खानने मागितली होती. मात्र आज देखील गौरीची ही मन्नत अपूर्णच राहिली आहे. AARYAN KHAN: Gauri Khan’s ‘Mannat’ is incomplete! At present, there is no ‘Kheer’ …
विशेष प्रतिनिधी
मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा सुपुत्र आर्यन खानच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानला आजही दिलासा मिळाला नाही. विशेष कोर्टानं (Special NDPS Court) आर्यन खानला जामीन नामंजूर केला आहे. आर्यन खानसह कोर्टानं अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धामेचा हिला देखील जामीन नाकारला आहे. त्यामुळे आर्यन खानसह तिघांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. आता आर्यन खानचे वकील हायकोर्टात (High Court) जामिनासाठी धाव धेवू शकतात.
दरम्यान,आर्यन खानसोबत त्याच्या बराकीत राहणाऱ्या श्रवण नडार या कैद्याने याबाबत आता माहिती दिली आहे. आर्यन खान तुरुंगात ढसाढसा रडत असे असं श्रवणने सांगितलं. एवढंच नाही तर आर्यनला तुरुंगात आणण्यात आलं तेव्हा त्याचे केसही कापण्यात आले. आर्यनला तुरुंगातील जेवण आवडत नसल्याने तो सुरूवातीला फक्त पार्ले बिस्किट खाऊन त्यावरच गुजराण करत असे. आर्यन खानला कोणतीही व्हीआयपी ट्रिटमेंट तुरुंगात मिळालेली नाही. तो कायमच हे सांगत असतो की तो निर्दोष आहे.
श्रवणने सांगितलं की पहिल्या दिवशी आर्यनने तुरुंगातला चहा घेतला. तो चहा त्याला मीच दिला होता. त्यादिवशी त्याने काहीही खाल्लं नाही. कँटिनमधून तो बिस्किटं, चिप्स मागवतो. बिस्किटं पाण्यात बुडवून खातो. नेहमी पॅक केलेलं म्हणजेच बाटलीबंदच पाणी आर्यन घेतो. तुरुंगातल्या नियमांप्रमाणे आर्यनला त्याचं अन्न रोज घ्यावं लागतं. आपल्या वाट्याचं अन्न तो इतर कैद्यांना देतो. एकदा त्याला मी याबाबत विचारलं होतं त्यावेळी त्याने भूक नाही, इच्छा नाही असं उत्तर दिलं. तो एकटाच असतो, कुणाशीही फार बोलत नाही.
Drugs-on-cruise case | Mumbai NCB says it has submitted WhatsApp chats of Aryan Khan in the court. Police has found a drug related WhatsApp chats that are allegedly between Aryan Khan and a debut Actress: NCB — ANI (@ANI) October 20, 2021
Drugs-on-cruise case | Mumbai NCB says it has submitted WhatsApp chats of Aryan Khan in the court.
Police has found a drug related WhatsApp chats that are allegedly between Aryan Khan and a debut Actress: NCB
— ANI (@ANI) October 20, 2021
क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकणाला (Cruise Drugs Party Case) वेगळं वळण लागलं आहे. ते म्हणजे, आर्यन खान आणि बॉलिवूडमधील एका नवोदित अभिनेत्रीचे व्हॉट्सअॅपवरील संभाषण ( WhatsApp Chat) उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) आर्यन आणि अभिनेत्रीचं व्हॉट्सअॅप चॅट कोर्टात सादर केले आहेत. त्यामुळेच कदाचित आर्यनचा जामीन नामंजूर करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App