विशेष प्रतिनिधी
मुंबई: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ऑर्थर रोड तुरुंगात आहे. कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात त्याला अटक करण्यात आलेली असून, त्याच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. आर्यनच्या जामीनावर २० ऑक्टोबर रोजी निकाल दिला जाणार असून, तुरुंगात मुक्काम असलेल्या आर्यन खानचं एनसीबीच्या कोठडीत असताना समुपदेशन अर्थात काऊन्सिलिंग करण्यात आली आहे.AARYAN KHAN: Aryan Khan’s ‘promise’ to Sameer Wankhede: ‘I will work as you feel proud’ …
अंमली पदार्थ विरोधी विभाग अर्थात एनसीबीने अभिनेता शाहरूख खान व डिझायनर गौरी खानचा मोठा मुलगा आर्यन खान याला अटक केलेली आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यनला अटक केलेली असून, त्याला ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे.
शाहरुख खानने आर्यनच्या जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केलेली असून, या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. जामीनासंदर्भातील निकाल न्यायालय २० ऑक्टोबर रोजी देणार असून, आता आर्यन खानचं एनसीबीच्या कोठडीत असताना समुपदेशन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यनला एसबीची कोठडी सुनावण्यात आलेली असताना काऊन्सिलिंग करण्यात आली. एका स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाऱ्याने आर्यनची काऊन्सिलिंग केल्याचं एनसीबीच्या सूत्रांनी सांगितलं. आर्यन खानबरोबरच अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या आणि अटक करण्यात आलेल्या आठही जणांची काऊन्सिलिंग करण्यात आली होती.
या काऊन्सिलिंगवेळी बाहेर पडल्यानंतर एक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न करेन, असं आर्यन खान म्हणाला. मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनीही आर्यन खानचं समुपदेशन केलं. त्यावेळी आपल्याला समाजातील गरिबांसाठी काम करायचं असल्याचं आर्यन खान म्हणाला.भविष्यात चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर तुम्हाला अभिमान वाटेल, असं काम भविष्यात करेन, असं आर्यन समीर वानखेडे यांना म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App