पुण्यात विमानतळावर सामानात बंदुकीची काडतुसे आढळली; बायकोने बॅग भरताना चुकीने ठेवल्याचा प्रवाशाचा दावा


वृत्तसंस्था

पुणे : पुणे विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगेत बंदुकीची जिवंत काडतुसे आढळल्याने सुरक्षारक्षक चक्रावले असून या घटनेमुळे खळबळ उडाली. परंतु बायकोने सामान भरताना ती चुकीने ठेवल्याचा दावा त्या प्रवाशाने केला आहे.A 45-year-old man headed to Prayagraj from Pune airport on Tuesday morning was not allowed to take his flight after the scanner showed that his luggage contained 12 live rounds of 0.32 caliber.

पुण्यातून उत्तर प्रदेशातील प्रयागराजला जाण्यासाठी हा प्रवासी विमानतळावर आला होता. तेव्हा त्याच्या सामानाची अन्य प्रवाशांप्रमाणे तपासणी केली. तेव्हा स्कॅनिंगमध्ये काडतुसांचे कारटेज दिसले. या प्रकाराने सुरक्षारक्षक चक्रावून गेले.



संबंधित प्रवाशाची चौकशी केली तेव्हा त्याने भोसरी एमआयडीसी येथे सुरक्षारक्षक पुरवणारा कंत्राटदार असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे हत्यार बाळगण्याचा परवाना असल्याचे तो म्हणाला.४५ वर्षांचा हा प्रवासी मंगळवारी सकाळी प्रयागराजला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आला. सामान तपासताना सुरक्षारक्षकांना १२ जिवंत काडतुसे आढळली.

त्यामुळे त्याला पुढील प्रवासास बंदी घालण्यात आली. तो म्हणाले, बायकोने माझी बॅग भरली. तेव्हा तिने घाईगडीत काडतुसे नजरचुकीने ठेवली असावीत. यानंतर त्याला सीआयएसएफ पथकाने विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

A 45-year-old man headed to Prayagraj from Pune airport on Tuesday morning was not allowed to take his flight after the scanner showed that his luggage contained 12 live rounds of 0.32 caliber.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात