Fire broke out at Prime Criticare Hospital in Mumbra : राज्यात कोविड सेंटरमध्ये आगीच्या दुर्घटना थांबण्याचे नाव नाही. आता ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्राइम क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये बुधवारी पहाटे अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर 20 रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे. आगीनंतर आयसीयूमध्ये दाखल झालेल्या सहा रुग्णांना दुसर्या रुग्णालयात हलविण्यात आले होते, यादरम्यान त्यातील चार जणांचा मृत्यू झाला. 4 died After Fire broke out at Prime Criticare Hospital in Mumbra Thane
वृत्तसंस्था
ठाणे : राज्यात कोविड सेंटरमध्ये आगीच्या दुर्घटना थांबण्याचे नाव नाही. आता ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्राइम क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये बुधवारी पहाटे अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर 20 रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे. आगीनंतर आयसीयूमध्ये दाखल झालेल्या सहा रुग्णांना दुसर्या रुग्णालयात हलविण्यात आले होते, यादरम्यान त्यातील चार जणांचा मृत्यू झाला.
4 people have died, cause of death will be ascertained through postmortem. Initially, we had received info that there are 12 people inside the hospital but the numbers may vary. Police investigation will be done. Action will be taken: Senior Police Inspector Madhukar Shivaji Kad pic.twitter.com/9wE9uI3mHH — ANI (@ANI) April 28, 2021
4 people have died, cause of death will be ascertained through postmortem. Initially, we had received info that there are 12 people inside the hospital but the numbers may vary. Police investigation will be done. Action will be taken: Senior Police Inspector Madhukar Shivaji Kad pic.twitter.com/9wE9uI3mHH
— ANI (@ANI) April 28, 2021
स्थानिक आमदार व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनेची माहिती घेतली. ठाणे महानगर पालिकेने म्हटले की, बुधवारी पहाटे 3.40च्या सुमारास ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयात भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. ठाणे महानगरपालिकेने या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री मदत निधीतून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे.
Today at around 03:40 am fire broke out at Prime Criticare Hospital in Mumbra, Thane. Two fire engines & one rescue vehicle are at the spot. Fire extinguishing underway. Four dead during shifting of patients to another hospital: Thane Municipal Corporation#Maharashtra pic.twitter.com/QR4NNYZd8Y — ANI (@ANI) April 28, 2021
Today at around 03:40 am fire broke out at Prime Criticare Hospital in Mumbra, Thane. Two fire engines & one rescue vehicle are at the spot. Fire extinguishing underway. Four dead during shifting of patients to another hospital: Thane Municipal Corporation#Maharashtra pic.twitter.com/QR4NNYZd8Y
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने असे सांगण्यात आले की, रुग्णांना दुसर्या रुग्णालयात हलविले जात असताना 4 रुग्णांचा मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली होती, मात्र यामागचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कदम यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण कळू शकेल. सुरुवातीला आम्हाला माहिती मिळाली की, रुग्णालयात आत 12 जण आहेत, परंतु येथे आल्यानंतर अधिक रुग्ण आढळले. आमची चौकशी सुरूच आहे. जर कोणी दोषी आढळले तर नक्कीच कारवाई केली जाईल.
4 died After Fire broke out at Prime Criticare Hospital in Mumbra Thane
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App