‘’अजित पवार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असल्यास…’’ मंत्री उदय सामंतांचं मोठं विधान!

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये खळबळ?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याची चिन्हं आहेत. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे चर्चांच्या केंद्रस्थानी आहेत. शिवाय त्यांची काही दिवासांपासूनची बदलेलली भूमिका, मध्येच अचानक गायब होणे हे पाहता ते लवकरच काहीतरी मोठा निर्णय घेतील, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर नेते मंडळींच्या विविध प्रतिक्रिया आता समोर येत आहेत. We will welcome Ajit Pawar if he is willing to join us Maharashtra minister Uday Samant

राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी अजित पवारांबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘’अजित पवार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू, त्यांना चांगला अनुभव आहे, ते मोठे नेते आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत काम केले आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. ते आमच्यात सामील झाल्यास आम्हाला खूप आनंद होईल.’’

याशिवाय, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही कालच एक भाकीत केलं होतं.  ‘’पंधरा दिवसांत बरंच मोठं राजकारण महाराष्ट्रात होईल. तेव्हा आपण १५ दिवस वाट पाहूयात. मी एवढंच बोलतोय पंधरा दिवस जरा थांबा. देशात दोन ठिकाणी मोठे राजकीय बॉम्बस्फोट होतील.’’ असं ते म्हणाले होते.

We will welcome Ajit Pawar if he is willing to join us Maharashtra minister Uday Samant

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub