• Download App
    बाबासाहेबांच्या रूपातले व्रतस्थ इतिहास तपस्वी आपल्या सोडून गेले; खासदार संभाजीराजेंची श्रद्धांजली । Vratastha ascetics in the form of Babasaheb left us; Tribute to MP Sambhaji Raje

    बाबासाहेबांच्या रूपातले व्रतस्थ इतिहास तपस्वी आपल्या सोडून गेले; खासदार संभाजीराजेंची श्रद्धांजली

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : आयुष्यभर एक व्रत घेऊन जगलेले इतिहास तपस्वी आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली. श्री.बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली! अशा शब्दांमध्ये राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे ट्विट करून बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  Vratastha ascetics in the form of Babasaheb left us; Tribute to MP Sambhaji Raje

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. मनसे प्रमुख राज ठाकरे, साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आदींनी बाबासाहेबांच्या पर्वती येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. बाबासाहेबांचे इतिहासातले योगदान महाराष्ट्र विसरू शकत नाही, अशा शब्दांमध्ये अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बाबासाहेबांच्या स्वप्नातील शिवसृष्टी लवकरात लवकर पूर्ण करण्याची आग्रही मागणी केंद्र आणि राज्य सरकार या दोघांकडे केले आहे.

    Vratastha ascetics in the form of Babasaheb left us; Tribute to MP Sambhaji Raje

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!