VIRAT VS DADA : विराट-गांगुली वादानंतर BCCI पुन्हा अडचणीत ; या अधिकाऱ्याचा तातडीने राजीनामा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या वाद सुरु आहेत. बीसीसीआयने अलीकडेच विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. तेव्हापासून विराट आणि बीसीसीआयकडून सातत्याने मोठमोठी वक्तव्यं येताना दिसतायत. आता याचदरम्यान बीसीसीआयकडून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. एका उच्च पदावरील अधिकाऱ्याने अचानक पदाचा राजीनामा दिला आहे. VIRAT VS DADA: BCCI in trouble again after Virat-Ganguly dispute; Immediate resignation of this officer

या अधिकाऱ्याचा राजीनामा

बीसीसीआयचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अभिजित साळवी यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला आहे. साळवी यांनी शनिवारी पीटीआयला सांगितले की, त्यांचा नोटीसचा कालावधी 30 नोव्हेंबर रोजी संपला होता, परंतु भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसर्‍या कसोटीपर्यंत त्यांनी काम केले जे 3 ते 7 डिसेंबर (6 डिसेंबर) दरम्यान सुरु होतं.



कोविड-19 च्या कठीण काळात बायो-बबल वातावरण आणि खेळाडूंची वारंवार तपासणी यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची बनली होती.

साळवी म्हणाले, “मला ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो. या संस्थेला 10 वर्षे पुढे घेऊन जाऊ इच्छित होतं. आता मला स्वतःला आणि कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. पुढील महिन्यात होणार्‍या बॉईज अंडर-16 नॅशनल चॅम्पियनशिपपूर्वी त्यांचा राजीनामा आला आहे.”

VIRAT VS DADA : BCCI in trouble again after Virat-Ganguly dispute; Immediate resignation of this officer

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात