• Download App
    उध्दव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे क्लास लावावा, रवी राणा यांचा टोला Uddhav Thackeray should take a class from Devendra Fadnavis, Ravi Rana's sujjestion

    उध्दव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे क्लास लावावा, रवी राणा यांचा टोला

    राज्यात सध्या शेतकरी, विद्यार्थी, महिला सर्वच वर्ग त्रस्त आहे. मात्र, मुख्यमंत्री केवळ घरात बसून राहतात. समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेत नाहीत. त्यांनी आतापर्यंत विदभार्तील शेतकऱ्यांना भेट दिलेली नाही. मात्र, एका महिला खासदाराची त्यांच्याकडून पिळवणूक केली जात आहे. त्याऐवजी राज्यातील समस्या सोडवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडे क्लास लावावा, असा टोला खासदार रवी राणा यांनी लगावला आहे. Uddhav Thackeray should take a class from Devendra Fadnavis, Ravi Rana’s suggestion


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राज्यात सध्या शेतकरी, विद्यार्थी, महिला सर्वच वर्ग त्रस्त आहे. मात्र, मुख्यमंत्री केवळ घरात बसून राहतात. समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेत नाहीत. त्यांनी आतापर्यंत विदभार्तील शेतकऱ्यांना भेट दिलेली नाही. मात्र, एका महिला खासदाराची त्यांच्याकडून पिळवणूक केली जात आहे. त्याऐवजी राज्यातील समस्या सोडवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडे क्लास लावावा, असा टोला खासदार रवी राणा यांनी लगावला आहे.

    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटले. पुर्ण परिस्थिती मी त्यांना सविस्तर सांगितली. मला अटक केल्यानंतरची पुर्ण स्थितीची माहिती दिली. मुंबईचे पोलिस आयुक्त यांच्यासह पोलिस आणि राज्य सरकारची मी तक्रार केली आहे. माझा तोंडी आणि लेखी जबाबही 23 मे रोजी संसदीय अधिकार समिती घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मी महिला असल्याचे भान ठेवावे. महिलांचा वैद्यकीय अहवाल मागणे चुकीचे आहे.

    नवनीत राणा यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. हनुमान चालिसाचा आग्रह केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गुंडांनी आमच्या मुंबई व अमरावतीतील घरांवर हल्ला केला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्हाला 20 फूट गाडण्याची भाषा केली. त्यासाठी स्मशानभूमीत सामान पोहोचवल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी आम्ही मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी अद्याप त्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्याकडे तक्रार करणार आहोत.

    महाराष्ट्रात तुरुंगात जाणारी मी पहिली महिला खासदार आहे. तुरुंगात प्रत्येकाला कैद्याप्रमाणेच वागणुक दिली जाते, हे मला मान्य आहे. मात्र, त्याबाबतही काही नियम आहे. मला तुरुंग प्रशासनाने जाणूनबुजून हिन वागणूक दिली. तुरुंगात माझा छळ करण्यात आला. माझी तब्येत बिघडल्यानंतरही योग्य उपचार दिले गेले नाही. माझी तब्येत बिघडल्यानंतरही रुग्णालयात दाखल करण्यासाठी जाणूनबुजून उशीर करण्यात आला. हे सर्व उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरच करण्यात आले. अहंकारी मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर अन्याय केला, असा आरोप करत या सर्व बाबींची माहिती आपण दिल्लीत देणार असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.

    मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्याच्या खार येथील घरात अनधिकृत बांधकाम झाल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. मुंबई महापालिकेचे पथक लवकरच त्यांच्या घराची पाहणी करणार आहे. यावर रवी राणा म्हणाले की, मुंबई पालिकेच्या नोटीशीचे आम्ही स्वागत करतो. पालिकेच्या पथकाने घराची पुर्ण पाहणी करावी. त्यांना आम्ही पुर्ण सहकार्य करू. मुंबईत हा एकच फ्लॅट आम्ही 10 वर्षांपुर्वी एका बिल्डरकडून खरेदी केला होता. आमच्याकडे संजय राऊत, अनिल परबांसारखे 10 फ्लॅट नाहीत, असे राणा म्हणाले.

    Uddhav Thackeray should take a class from Devendra Fadnavis, Ravi Rana’s suggestion

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!