विशेष प्रतिनिधी
सांगली : वाळवा तालुक्यातील येलूर येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या घोल शिवार परिसरात घडली.Two seriously injured in cow attack at Yelur; Terror among the people of Valva taluka of Sangli
शिवाजी परसू कुभार (वय ४५), प्रा. सूर्यकांत बाळासाहेब जाधव (वय ३२, दोघे रा. येलूर) अशी या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, शिवाजी कुंभार व त्यांची पत्नी आज सकाळी शेतात खोडवी गोळा करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी उसाच्या फडातून येवून गव्याने शिवाजी यांना धडक मारली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना इस्लामपूर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.शेतात गेलेले प्रा. जाधव यांच्यावरही गव्याने हल्ला केला आहे. तेही जखमी झाले असून त्यांच्यावर येलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार चालू आहेत.
ही घटना सकाळी सात वाजता घडली. तंटामुक्ती अध्यक्ष राजन महाडिक यांनी वन विभागाशी संपर्क साधून या हल्ल्याची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या हल्ल्यामुळे परिसरात शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App