• Download App
    नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा कोरोनाची लागण । To Urban Development Minister Eknath Shinde Also corona infection

    नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा कोरोनाची लागण

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मंत्री, आमदार आणि नेते मंडळींना चांगलेच महागात पडल्याचे चित्र आहे. अनेकांना कोरोना झाल्याचे दिसून आले. आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा कोरोना झाला आहे. To Urban Development Minister Eknath Shinde Also corona infection

    एकनाथ शिंदे यांनी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे म्हंटले आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.



    महाराष्ट्रातील १० मंत्री आणि २० पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकतीच दिली होती. त्यानंतर नेतेमंडळी सर्वाधिक कोरोना बाधित होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनातून कोरोना संक्रमण जास्त पसरल्याचे स्पष्ट होत आहे.

    To Urban Development Minister Eknath Shinde Also corona infection

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Fadnavis : फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान, पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील

    Madhavi naik : भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 जणांची नावे निश्चित:निष्ठावंतांना कौल; विवेक कोल्हे, प्रमोद जठार, माधवी नाईकांसह सुनील कर्जतकरांना संधी

    भाजपने एका झटक्यात दिले ५ उमेदवार, पण राष्ट्रवादीला त्यांच्या वाट्याचा एक उमेदवार ठरवता येईना!!