विशेष प्रतिनिधी
पुणे : स्पेशल 24 चित्रपटातील पद्धतीने सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून तिघांनी एका ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले.विशेष म्हणजे शेजारी राहणाऱ्या महिलेनेच हा प्रकार केला. Three, including a woman pretending to be a CBI officer, robbed senior citizen
हवेली तालुक्यातील कोरेगाव मुळ या गावात राहणाऱ्या 62 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने लोणीकाळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या इमारतीत राहणारी रेश्मा शेख तिच्या साथीदारासह 12 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरात घुसली.
सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी त्यांनी केली घरातील लॅपटॉप, मोबाइल, मोटारीचा स्टार्टर, कागदपत्र आणि बँकेची कागदपत्रे असा मुद्देमाल ताब्यात घेतला.
त्यांनी फिर्यादी यांना जबरदस्तीने गाडीत बसवून जबर मारहाण केली. दीड लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास खोटी केस करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना खेड शिवापूर येथे सोडून आरोपी पळून गेले, असे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App