वृत्तसंस्था
मुंबई : मला मारण्याचे कटकारस्थान रचले होते, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. तसेच दिशा सालियान प्रकरणी पुरावे असल्याचे सांगितले. There was a plot to kill me; Sensational allegations of Nitesh Rane
कोल्हापूरच्या रुग्णालयात मी अँजिओग्राफी नकार दिला होता. एका कर्मचाऱ्याने सांगितले की तुम्ही अँजिओग्राफीला होकार देऊ नका. तुमच्या शरीरात इंक टाकून तुम्हाला मारण्याचा प्लॅन आहे. माझी प्रकृती खराब असतानाही मला अटक करण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजता दोनशे पोलिस आले होते, असा खळबळजनक आरोप राणे विधानसभेत बोलताना केला. माझा बीपी, शुगर लेव्हल कमी होती. तरीही रात्री अडीच वाजता दोनशे पोलिस माझा डिस्चार्जसाठी पाठविले होते.
दिशाची हत्याच, पुरावे असल्याचा दावा
दिशा सालियनची आत्महत्या असेल, तर मग सीसीटीव्ही का गायब केले. वॉचमन गायब, वहिची पाने गायब. रोहन रॉय गायब आहे..दिशाची आत्महत्या नाही हत्याच आहे. माझ्याकडे त्याबाबतचा पेन ड्राईव्ह आहे, तो मी न्यायालयात देणार आहे. माझ्याकडे पुरावा आहे. आम्ही सिद्ध करू शकतो की ८ तारखेच्या रात्री एक मंत्री त्या ठिकाणी होता, असा आरोप राणे यांनी पुन्हा केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App