वृत्तसंस्था
नवी दिल्ली :कोरोना लसीकरणासाठी कोविन प्लॅटफॉर्वर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लोक ऑन दी स्पॉट लस घेऊ शकतात, अशी माहिती केंद्र सरकारने दिली. There is no online registration restriction on the Covin app
देशात लसीकरण वेगाने व्हावे, यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. अगोदर नाव नोंदणी नंतर अपॉइंटमेंट घेणे आणि नंतर लस घेणे, ही प्रक्रिया तशी वेळकाढू होती. त्यामुळे सरकारने आता थेट लस घेण्याची संधी नागरिकांना दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने परिपत्रकात म्हटलं की, आता लसीकरणासाठी आधी रजिस्ट्रेशन करुन अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही. १८ वर्षांवरील नागरिक जवळच्या केंद्रावर जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करुन लस घेऊ शकतात. या निर्णयामुळे ग्रामस्थ आणि मोबाईल इंटरनेट न वापरणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
कोरोना लसीकरणासाठी आधी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन अनिवार्य होतं. यावर सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारला फटकारले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App