विशेष प्रतिनिधी
सोलापूर : बीड जिल्ह्यातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठ्याकडे ऊसतोडीसाठी मजुरांना घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातामध्ये एक महिन्याच्या लहान बाळ मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. The tractor’s trolley overturned one month Child died
ही दुर्घटना मोहोळ – नरखेड रस्त्यावर मोहोळ गावच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. भंडारकवठे साखर कारखान्याकडे भरधाव वेगाने जात असणारी ट्रॅक्टर ट्रॉली चालकाचा ताबा सुटल्याने उलटली. यामध्ये अर्णव चव्हाण हा एक महिन्याचा बालक जागीच ठार झाला, तर उषा चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातप्रकरणी ट्रॅक्टरचालक सचिन साळुंखे यांच्याविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत बालकाचे आजोबा धनु चव्हाण यांनी फिर्याद दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App