विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणावरून राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणावरुन ठाकरे सरकावर कडक ताशेरे ओडले आहेत. हे सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. राज्य सरकारने गेल्या दोन वषार्पासून राज्य महिला आयोगाची स्थापना का केली नाही असा सवाल आयोगाने केला आहे.The Thackeray government is insensitive towards women, has not set up a women’s commission for two years, Tashree of the National Commission for Women
कायदेव्यवस्था सरकारच्या नियंत्रणात नसल्यामुळेच या घटना घडत असल्याचा आरोप करत डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात येणार असून पोलिस वरिष्ठ अधिकाºयांना भेटून विस्तृत माहिती घेतली जाणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. राज्य सरकारने गेल्या दोन वषार्पासून राज्य महिला आयोगाची स्थापना का केली नाही असा सवाल आयोगाने उपस्थित केला आहे.
एकीकडे, संपूर्ण देशात महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात महिला आयोग नसल्यामुळे पीडित महिला कुठे न्याय मागणार? जर राज्यात आयोगाची स्थापना झाली असती तर या पीडित महिलेला न्याय मिळाला असता असेही आयोगाने म्हटले आहे. राज्य सरकार महिलांच्या बाततीत संवेदनशील नसून त्यांना महिलेची कोणतीच चिंता नसल्याचा आरोपही केला.
महत्त्वाच्या बातम्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App