आसाम आणि गोवा या छोट्या राज्यांना सवलत देणे परवडते तर महाराष्ट्र सारख्या सर्वांत श्रीमंत राज्यालाही सवलत परवडली पाहिजे.अस चंद्रकांत पाटील म्हणाले. The Thackeray government has nothing to do with public issues; Criticism of Chandrakant Patil
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केल्यानंतर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी आता राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सवलत दिल्यानंतर राज्यात ‘व्हॅट’मध्ये कपात करून दर आणखी कमी करण्यात सत्ताधारी आघाडीकडून टाळाटाळ सुरू झाल्याने या तीनही पक्षांचा ढोंगीपणा उघड झाला आहे.या पक्षांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नसून केवळ केंद्र सरकारवर सातत्याने जबाबदारी ढकलायची आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
पुढे चंद्रकांत पाटील की, केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात सवलत दिली मग आता महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करून राज्यात अधिक सवलत दिलीच पाहिजे. जर आसाम आणि गोवा या छोट्या राज्यांना सवलत देणे परवडते तर महाराष्ट्र सारख्या सर्वांत श्रीमंत राज्यालाही सवलत परवडली पाहिजे.पण काय झालय ना सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी अस ठरवलय की सर्व सवलत केंद्रानेच द्यावी . जर सर्व जबाबदारी केंद्रानेच पार पाडावी आणि राज्याने केवळ कर वसुली करावी, हे चालणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App