लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम राज्य सरकार करतय – प्रसाद लाड

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहेThe state government is working to strangle democracy – Prasad Lad


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज करून नॉट रिचेबल असेलले नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे.



नारायण राणे यांना काल पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता की, नितेश राणे सध्या कोठे आहेत?.यावर भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी सवाल केला आहे.प्रसाद लाड म्हणाले की , आमदार नितेश राणे कुठे आहेत ? हे शोधणे पोलिस यंत्रणेचे काम आहे. मग त्यांच्या चौकशीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस का ? असा सवाल भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला आहे.

दरम्यान श्री.राणे यांच्यावर होत असलेली कारवाई सूडबुद्धीची असून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. केंद्रीय मंत्री राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर श्री. लाड यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.

The state government is working to strangle democracy – Prasad Lad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात