हाय प्रोफाइल महिलांसोबत ‘सेक्स’चे आमिष, 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला 60 लाखांचा गंडा

हाय प्रोफाईल महिलांसोबत सेक्स करण्यातून भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका महिलेने 76 वर्षाच्या व्यावसायिकाची 60 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. The lure of ‘sex’ with high profile women, cheating of Rs 60 lakh of 76-year-old senior citizen


विशेष प्रतिनिधी

पुणे : हाय प्रोफाईल महिलांसोबत सेक्स करण्यातून भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका महिलेने 76 वर्षाच्या व्यावसायिकाची 60 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.
दिपाली कैलास शिंदे (वय 28, रा नेताजीनगर, वानवडी) असे या महिलेचे नाव आहे. हा प्रकार मे 2021 पासून फेब्रुवारी 2022 पर्यंत सुरु होता. याबाबत सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी हे व्यावसायिक आहेत.



त्यांनी मिनाक्षी फ्रेंडशिप क्लब नावाची जाहिरात पाहून संपर्क केला. त्यात त्यांना क्लब हा श्रीमंत-हाय प्रोफाईल लेडीज सोबत सेक्स करण्यासंदर्भात असून त्याबद्दल भरपूर पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. श्रीमंत हाय प्रोफाईल लेडीजसोबत मिटिंग करुन देण्यासाठी सिक्युरिटी फी भरावी लागेल, असे सांगून सुरुवातील 2 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेने तिच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगून एकूण 60 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली.
सायबर पोलिसांकडे त्याची तक्रार मिळाल्यावर आरोपीने गुन्ह्यात वापरलेले बँक अकाऊंटची माहिती व इतर माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये आरोपी ही वानवडी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तिचा शोध घेऊन शिंदे हिला अटक करण्यात आली आहे.

The lure of ‘sex’ with high profile women, cheating of Rs 60 lakh of 76-year-old senior citizen

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात