प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर येथील श्री शाहू मिलच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कार्यातील पाहिले पाऊल म्हणता येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा असणारा शाहू मिलचा भोंगा पुन्हा एकदा कोल्हापूरांना ऐकू येणार आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहून दिली आहे. The first step in the construction of Shahu Maharaj’s memorial in Kolhapur
श्री शाहू मिलच्या जागेवर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक व्हावे ही कोल्हापूरकरांची जुनी मागणी आहे. शासन स्तरावर अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता शिंदे फडणवीस सरकारने या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
या पोस्टमध्ये चंद्रकांतदादा पाटील म्हणतात :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App