पुणे : महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात बुधवारी (ता.६) मनसेच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा तेथील सुरक्षा रक्षकांसाठी डोकेदुखी होऊन बसलाय. सुरक्षेत हयगय केल्याप्रकरणी त्यावेळी कामावर असणाऱ्या कंत्राटी आणि कायम सुरक्षा रक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. Kishor Shinde
मनसेचे पदाधिकारी माजी नगरसेवक किशोर शिंदे, संजय भोसले, तांबोळी यांच्यासह आणखी एक कार्यकर्ता, हे आयुक्त नवल किशोर कुमार यांना भेटण्यासाठी थेट कार्यालयात गेले. तिथे शिंदे आणि आयुक्त यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनही झाले.
हा सगळा गोंधळ सुरक्षा रक्षकांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. शिंदे हे आयुक्तांना भेटायला विनापरवानगी आले. ते येत असतांना त्यांची नोंद घेणे ही सुरक्षा रक्षकांची जबाबदारी आहे आणि त्यात कसूर केल्यामुळे एकूण ५ सुरक्षारक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्यातील २ हे महापालिकेचे कायम स्वरूपी असणारे रक्षक होते तर, ३ रक्षक हे ‘ईगल सिक्युरिटी अँड पर्सोनेल सर्व्हिसेस’ या कंत्राटी कंपनीचे होते.
याबाबत महापालिका उपायुक्त संदीप खलाटे यांनी आदेश काढले आहेत. आयुक्त कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था बदलण्यात आली आहे. येथील ५ सुरक्षारक्षकांची तातडीने बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता महापालिकेच्या सेवेतील (नवीन) ५ आणि महारष्ट्र सुरक्षा दलाचे (एमएसएफ) ५ अश्या एकूण १० नवीन रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय आयुक्त कार्यालयातील सुरक्षा कडक करण्याच्या उद्देशाने घेतला गेला आहे. Kishor Shinde
दरम्यान, आयुक्तांना कार्यालयातील सुरक्षेमधल्या त्रुटी दिसतात, मात्र त्यांच्या शासकीय निवासस्थानातील कोलमडलेल्या सुरक्षेच काय? त्यांच्या घरात झालेल्या लाखोंच्या चोरीसाठी ते निवासस्थानातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरवणार का? कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था तातडीने बदलवून घेणारे आयुक्त, निवासस्थानातील सुरक्षा यंत्रणेबद्दल बोलायलाही का धजत नाहीत? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App