पोस्टर वरचे मुख्यमंत्री आले लाडू वर, निवडणुकीच्या आधीच नाना बसले खुर्चीवर!!

प्रतिनिधी

नागपूर : पोस्टर वरचे मुख्यमंत्री आले लाडू वर, निवडणुकीच्या आधीच नाना बसले खुर्चीवर!!, असे आज घडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज गोंदियातील कार्यकर्त्यांनी त्यांची लाडू तुला केली. या लाडूंवर नानांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून लिहिले होते. नंतर हे लाडू तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजीत वाटण्यात आले. कार्यकर्त्यांनी आपले नाव भावी मुख्यमंत्री म्हणून लाडू वर लिहिले म्हणून नानाही आज खुश होते.The Chief Minister on the poster came on the ladoo, Nana sat on the chair before the election!!



तसेही भावी मुख्यमंत्री म्हणून नानांचे नाव काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आधीच भंडाऱ्यातल्या पोस्टरवर झळकवले होतेच. त्यात आता भर पडून गोंदियातल्या कार्यकर्त्यांनी नानांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून लाडू वर लिहिले.

पण हा पराक्रम अजून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जमलेला नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनुक्रमे अजित पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचीच नावे फक्त पोस्टरवरच भावी मुख्यमंत्री म्हणून झळकवली आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या पोस्टर बॉईज मुख्यमंत्र्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. पण त्या पलीकडे जाऊन आता नानांना मात्र कार्यकर्त्यांनी केवळ पोस्टरवर भावी मुख्यमंत्री म्हणून ठेवले नाही, तर ते प्रत्यक्ष लाडू वर लिहून त्यांची तुला करून टाकली. त्यामुळे नानांबरोबरच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनात लड्डू फुटले असतील यात शंका नाही!!

The Chief Minister on the poster came on the ladoo,Nana sat on the chair before the election!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात