Thackeray – Pawar Govt : भाजपने महाविकास आघाडी फोडली तर सरकार पडेल; कुमार केतकरांच्या पाठोपाठ बोलले पृथ्वीराज चव्हाण!!


प्रतिनिधी

मुंबई : उत्तर प्रदेशासह भाजपने चार राज्ये जिंकल्यानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला अस्थिरतेचा धोका उत्पन्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे सरकार केव्हाही पडू शकते, असे वक्तव्य राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी केले होते. आज त्यांच्याच वक्तव्याला काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.Thackeray – Pawar Govt: If BJP breaks Mahavikas alliance, government will fall; Prithviraj Chavan spoke after Kumar Ketkar

विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा जोर वाढला आहे. पण तरी देखील निवडणुकीचा निकालाचा परिणाम महाराष्ट्रावर होईल, असे वाटत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पण त्याच वेळी त्यांनी भाजपने महाविकास आघाडीतला एखादा घटक फोडला तर हे सरकार पडू शकते, असे वक्तव्य केले.



त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे आणि ते केव्हाही पडू शकते, या राजकीय शंकेला मोठा वाव मिळाला आहे. कुमार केतकर यांच्यासारखे काँग्रेस हायकमांडच्या जवळचे खासदार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखेही काँग्रेस हायकमांडच्या जवळचेच वरिष्ठ नेते महाविकास आघाडी सरकारच्या पडण्याच्या गोष्टी करतात तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या अस्थिरतेच्या शंकेचे रूपांतर खात्रीत व्हायला लागते.

Thackeray – Pawar Govt: If BJP breaks Mahavikas alliance, government will fall; Prithviraj Chavan spoke after Kumar Ketkar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात