विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय तपास संस्थांच्या फास राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांभोवती आवळत चालला असताना राज्याच्या गृह मंत्रालया वरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अतिवरिष्ठ नेतृत्व मधला वाद समोर आला. राष्ट्रवादीचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकार्यांवर पूर्ण विश्वास व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या.Thackeray – Pawar Feud: Shiv Sena – NCP Chief Minister – Home Minister exchanged
पण त्याआधी आणि त्यानंतरही महाराष्ट्रात चर्चेच्या वावड्या जोरजोरात हवेत उडाल्या. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात गृहमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाच्या आदलाबदलीच्या देखील चर्चांच्या वावड्या जणू काही ठाकरे आणि पवार प्रसार माध्यमांच्या कानात येऊन आपले सगळे म्हणणे सांगतात अशा थाटात प्रसार माध्यमांमधल्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आपल्या बदलीच्या चर्चा रंगल्या. यामुळे महाराष्ट्रात आता राजकीय भूकंप होणार अशा अटकळी बांधल्या जाऊ लागल्या.
– जुना व्हिडिओ व्हायरल
त्याच वेळी टीव्ही 9 न्यूज चॅनेलची एक जुनी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. देवेंद्र फडणवीस सरकार पायउतार झाल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. त्याची क्लिप काही लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळे जणू काही आजच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागल्याची वदंता महाराष्ट्रात पसरली. पण त्यापलिकडे जाऊन अनेकांनी शिवसेनेचे प्रवक्ते आणि मावळते खासदार संजय राऊत यांना महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदी “बसवून” टाकले. त्याच वेळी आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या पदांची आदलाबदल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस करणार आणि अर्थातच मुख्यमंत्री पदी सुप्रिया सुळे येणार अशा चर्चांच्या वावड्याही हवेत उंच उंच उडवल्या गेल्या. परंतु यातले प्रत्यक्षात काहीही न घडता मुख्यमंत्र्यांनी आपला सहकार्यांवर विश्वास आहे असे सांगत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
– ईडीचा वरवंटा थांबत नाही
केंद्रीय तपास संस्था सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आणि सीबीआय यांच्या कारवाया मात्र कोर्टाच्या हुकुमावरून महाराष्ट्रात आपल्या गतीने सुरू आहेत. त्यात कोणताही खंड पडलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App