• Download App
    "Team" Maharashtra : "ए" टीम ते "ढ" टीम... विरोधकांचा राजकीय प्रवास!!; ही तर राष्ट्रवादीची "ढ" शिवसेनेवर मनसेचे टीकास्त्र!! । "Team" Maharashtra: "A" team to "D" team ... Opposition's political journey !!; This is MNS's Tikastra on Shiv Sena's "Dha" of NCP !!

    “Team” Maharashtra : “ए” टीम ते “ढ” टीम… विरोधकांचा राजकीय प्रवास!!; ही तर राष्ट्रवादीची “ढ”टीम शिवसेनेवर मनसेचे टीकास्त्र!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचा प्रवास “ए” टीम ते “सी” टीम आणि त्या पलिकडे जाऊन आता “ढ” टीम पर्यंत येऊन पोहोचला आहे. मनसे ही भाजपची “सी” टीम असल्याची टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी मनसे कोणाची “सी” टीम आहे, हे पाहू नये, त्यापेक्षा शिवसेना राष्ट्रवादीची “ढ” टीम झाली आहे, तिकडे लक्ष द्यावे, असे खोचक शरसंधान संदीप देशपांडे यांनी केले आहे. “Team” Maharashtra: “A” team to “D” team … Opposition’s political journey !!; This is MNS’s Tikastra on Shiv Sena’s “Dha” of NCP !!

    भाजप विरोधकच एकमेकांना डिवचताहेत

    देशाच्या राजकारणात भाजपचा उदय झाल्यानंतर हिंदू – मुस्लिम ध्रुवीकरण अधिक वाढले. यातून काँग्रेस, समाजवादी पार्टी यांच्या मतांमध्ये घट झाली. ही घट प्रामुख्याने हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणातून झाल्यामुळे एमआयएम पक्षाला भाजपची “बी” टीम म्हणण्याची राजकीय फॅशन सुरू झाली. आता त्या फॅशनचे लोण महाराष्ट्रात येऊन पोहोचले आहे. त्यातूनच भाजप सोडून बाकी सगळे पक्ष एकमेकांना भाजपची “बी” टीम, “सी” टीम ते “ढ” टीम इथ पर्यंत डिवचायला लागले आहेत.



    त्यातही या सर्व पक्षांचे वैशिष्ट्य असे की 10 राज्यांमध्ये भाजपची सत्ता नसताना तसेच अनेक ठिकाणी तो पक्ष नगण्य असताना भाजपला मात्र कोणी “बी” – “सी” अथवा “ढ” टीम असे डिवचताना कोणी दिसत नाही. उलट भाजप विरोधातले पक्षच एकमेकांना भाजपची दुय्यम “बी” “सी” ते “ढ” टीम असे डिवचताना दिसत आहेत.

    “Team” Maharashtra: “A” team to “D” team … Opposition’s political journey !!; This is MNS’s Tikastra on Shiv Sena’s “Dha” of NCP !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!

    435 कोटी थकबाकीच्या कारखान्याच्या गोडाऊनला बँकेने ठोकले सील; पवार समर्थकांनी त्याचा संबंध जोडला पवारांच्या सभेशी!!